पुणे – पाथ-वे फाउंडेशन आयोजित दोशी इंजिनियर्स करंडक आंतरक्लब 25 वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत 10 संघांना आमंत्रित करण्यात आले आहे.
ही स्पर्धा 14 ते 31 ऑक्टोबर 2021 या कालावधीत पीवायसी हिंदू जिमखाना, डेक्कन जिमखाना, क्लब ऑफ महाराष्ट्र, ऍम्बिशियस, ब्रिलियंटस, डिव्हीसीए व पूना क्लब मैदानावर होणार आहेत, अशी माहिती पाथ-वे फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजीत जाधव आणि सचिव सिद्धार्थ निवसरकर यांनी सांगितले.