उझबेकीस्तानकडून मोदी, इम्रान खान यांना कनेक्‍टिव्हिटी समिटसाठी निमंत्रण

ताश्‍कंद – उझबेकिस्तानने 15 ते 16 जुलै दरम्यान उझ्बेकची राजधानी ताश्‍कंद येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय संपर्क शिखर परिषदेसाठी मध्य आशियातील इतर नेत्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनाही आमंत्रित केले आहे. 

उझ्बेकचे अध्यक्ष शावकत मिरज्योयेव यांचा पुढाकार असलेल्या “मध्य आशिया आणि दक्षिण आशिया प्रादेशिक संलग्नता : आव्हाने आणि संधी’ नावाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन उझ्बेकीस्तानची राजधानी ताश्‍कंदमध्ये 15 ते 16 जुलै दरम्यान केले गेले आहे. 

या शिखर परिषदेत आर्थिक, सांस्कृतिक, सुरक्षा आणि संलग्नता हे चर्चेचे तीन सामान्य विषय असतील आणि ऐतिहासिक संबंधांचे नुतनीकरण करण्याचे उद्दीष्ट असेल. रशिया, इराण, चीन, अमेरिका आणि युरोपियन युनियनचे नेतृत्व आणि प्रतिनिधींना या शिखर परिषदेसाठी आमंत्रित आहेत.

उझ्बेक परराष्ट्रमंत्री अब्दुलाझीज कामिलॉव्हच्या फेब्रुवारीच्या उत्तरार्धात नवी दिल्लीत आले होते त्या वेळी भारताला निमंत्रण देण्यात आले होते. निमंत्रण देण्यासाठी कामिलॉव्हने अन्य 4 मध्य आशियाई देशांना भेट दिली आहे. मार्चमध्ये, कामिलॉव्ह हे आमंत्रण देण्यासाठी इस्लामाबादला गेले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.