नवी दिल्ली – दुचाकी उत्पादक हीरो मोटोकॉर्प या कंपनीने कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण मोफत करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर या कंपनीच्या इतर संलग्न कंपन्यातील कर्मचाऱ्यांचे लसीकरणही विनामूल्य केले जाणार असल्याचे कंपनीने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. यासंदर्भात केंद्र सरकारकडून परवानगी घेऊन नंतर आरोग्य यंत्रणांशी समन्वय साधून हे काम करण्यात येईल असे कंपनीने म्हटले आहे.
पियाजियो या कंपनीनेही आपल्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण मोफत करून देण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे आणि बारामतीतील आरोग्य केंद्रांमध्ये कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून करण्यात येणार असुन यासाठीचा खर्च कंपनी करणार असल्याचे सांगण्यात आले. यामुळे कंपन्यांमध्ये कामासाठी सकारात्मक वातावरण निर्माण होईल असे या कंपन्यांना वाटते.