पुणे – लग्नाच्या अमिषाने बलात्कार केल्याप्रकरणात तरूणाला 3 ऑगस्टपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी.पी. आगरवाल यांनी मंजुर केला.
शुभम मनोज बागडे (वय 24, रा. पिंपरी) असे त्याचे नाव आहे. त्याने अॅड. पुष्कर दुर्गे यांचामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. याबाबत पीडित 18 वर्षे 5 महिन्याच्या मुलीने वाकड पोलिसात फिर्याद दिली आहे.
ही घटना 11 फेब्रुवारी 2020 रोजी दिघी भागातील एका लॉजवर घडली. शुभमचे घरचे फिर्यादीच्या घरी गेले. शुभमशी लग्न करण्यासाठी फिर्यादीला मागणी घातली. त्यावेळी मुलगी शिकत असल्याने दोन वर्षांनी लग्न करण्याबाबत तिच्या घरच्यांनी सांगितले. त्यावेळी भेटून, लॉजवर नेऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला. काही दिवसांनी तिला धमकावले आणि मारहाण केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर शुभम याच्या वतीने अॅड. पुष्कर दुर्गे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावेळी पुराव्यामध्ये ढवळाढवळ करायची नाही, तपासास सहकार्य करण्याच्या अटीवर न्यायालयाने हा निकाल दिला.