अॅड. तौसिफ शेख यांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मागणी
पुणे – राज्यात कोविड 19 चा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील सर्व हॉटेल्स, मंगल कार्यालय आणि प्रार्थना स्थळे ताब्यात घेऊन कोविंड सेंटर उभारावीत. या सेंटरमध्ये सर्वांचा मोफत उपचार करावा, अशी मागणी अॅड. तौसिफ शेख यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. शेख हे शिवाजीनगर आणि उच्च न्यायालयात प्रॅक्टीस करणारे वकील असून, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ( आय) महासचिव आहेत.
महाराष्ट्रात देशात सर्वाधिक रुग्ण आहेत. आणखी किती दिवस ही परिस्थिती राहणार, हे सांगता येत नाही. वैद्यकीय सुविधा कमी पड्त आहेत. बेड अपुरे आहेत. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हॉटेल्स, मंगल कार्यालय बंद असल्यासारखी आहेत. प्रार्थनास्थळेही बंदच आहेत. या पार्श्वभूमीवर येथील मोठी जागा उपचारासाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे कोविड सेंटर उभारावे, असे मुख्यमंत्र्याना दिलेल्या निवेदनात म्हटले असल्याचे अॅड. तौसिफ शेख यांनी सांगितले.