पुणे – स्टेट बॅंकेने व्याजदर कपातीची घोषणा केल्यानंतर आता इतर बॅंकाही व्याजदर कपात करू लागल्या आहेत. इंडियन बॅंकेनेही आपल्या “एमसीएलआर’ आधारित व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली आहे. ही कपात 3 जानेवारीपासून लागू होणार आहे.
ओव्हरनाइट कालावधीसाठी एमसीएलआर दर आता 7.95 वरून 7.90 टक्के केला आहे. 3 महिन्यांसाठीचा व्याजदर 8.20 वरून 8.15 टक्के करण्यात आला आहे. सहा महिन्यांसाठीचा व्याज दर 8.25 वरून 8.20 टक्के करण्यात आला आहे. एक वर्षासाठीचा व्याजदर 8.35वरून 8.30 टक्के इतका करण्यात आला आहे.
या घोषणेनंतर बॅंकेच्या शेअरच्या भावात बरीच वाढ झाल्याचे दिसून आले. सरलेल्या वर्षात आतापर्यंत रिझर्व्ह बॅंकेने आपल्या रेपो दरांमध्ये 1.35 टक्क्यांची कपात केली आहे. मात्र, व्यावसायिक बॅंकांनी आतापर्यंत केव्हा 0.44 टक्क्यांची कपात केलेली आहे. रिझर्व्ह बॅंकेने व्यावसायिक बॅंका आणखी व्याजदरात कपात करतील, अशी आशा या अगोदर जाहीर केलेल्या पतधोरणावेळी व्यक्त केली होती.
भारतातील व्याजदर इतर विकसित देशातील व्याजदराने इतके कमी असावेत, अशी रिझर्व्ह बॅंकेची इच्छा आहे. त्या दृष्टीने मध्यम आणि दीर्घ पल्ल्यात प्रयत्न करण्यात येत आहेत.