मार्शल आर्ट्स फाईटर ते इन्व्हेस्टमेंट बँकर आणि त्यानंतर मॉडेलिंग असा प्रवास करत मिस्टर इंडीया प्रतीक जैन आता “आलिशान” ह्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.
प्रतीक जैन हा बंगळुरुचा असून तो मार्शल आर्ट्समध्ये पारंगत आहे. तसंच इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून त्याने तीन वर्ष कामसुध्दा केले आहे. बर्याच नामांकित ब्रँड्सबरोबर शुटिंग व मॉडेलिंग केल्यानंतर प्रतिकने मिस्टर वर्ल्ड इंडिया २०१४ चा विजेताचा किताब पटकावला.
प्रतीक जैनने नुकतेच तेलगू चित्रपट “वेंकी मामा” ह्या चित्रपटातून तेलगू सिनेमात पदार्पण केले. प्रतीकने शाहरुख आणि आलिया भट स्टारर “डिअर जिंदगी” ह्या चित्रपटात कॅमिओ केला होता आणि आता तो बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. “आलिशान” हा एक एक्शन थ्रिलर सिनेमा असून तो पुढच्या वर्षी २०२० मध्ये रिलीझ होणार आहे.