वॉशिंग्टन – मानवी मृत्यू हा सर्वांसाठीच कुतूहलाचा विषय आहे या विषयावर आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर शास्त्रीय पद्धतीने संशोधनही झाले आहे माणसाला मृत्यू येण्यापूर्वी नक्की काय होते हे शोधण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयोग करण्यात आले आहेत आता अमेरिकेतील एका विद्यापीठातील डॉक्टर्सनी एक संशोधन केले असून त्यांच्या संशोधनातील निष्कर्ष प्रमाणे मृत्यूपूर्वी 30 सेकंद मानवी मेंदूमध्ये एका प्रखर प्रकाश चमकतो.
आणि त्यानंतर माणसाचा मृत्यू होतो अमेरिकेतील लुईसव्हील विद्यापीठातील डॉक्टर्सनी हे संशोधन केले असून त्यांनी या तीस सेकंदाच्या प्रक्रियेला लास्ट रिकॉल असे नाव दिले आहे 87 वर्षे वयाच्या वृद्धावर हा प्रयोग करण्यात आला त्याचा मृत्यू जवळ येत असतानाच त्याच्या मेंदूचे स्कॅनिंग करण्यात आले होते त्याचा मृत्यू झाल्यानंतर स्कॅनिंगची छायाचित्रे समोर आली तेव्हा हा निष्कर्ष डॉक्टरांच्या लक्षात आला.
या विद्यापीठाचे डॉक्टर अजमल जॅमर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या 87 वर्षाच्या व्यक्तीला मृत्यूपूर्वी 30 सेकंद आपल्या मेंदूमध्ये झालेली ही गडबड लक्षात आली असावी मेंदूमध्ये रक्तप्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला मृत्यूपूर्वी संबंधित व्यक्तीला आपण आता या जगाचा निरोप घेणार आहोत याची कल्पना येते असा निष्कर्ष या संशोधनावरून समोर येत आहे.
डॉ हेमार यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मृत्यूपूर्वी मेंदूमध्ये अशा प्रकारचा प्रकाश उत्पन्न होण्याच्या कारणांमध्ये अल्फा आणि गॅमा किरणे असावीत जेव्हा रक्तप्रवाह थांबतो तेव्हा गामा आणि अल्फा किरणे तयार होतात आणि त्याच्या माध्यमातून हा अनोखा प्रकाश मेंदूमध्ये तयार होतो जगभरातील वैद्यकीय तज्ञांनी या संशोधनाचे स्वागत केले असून यामुळे आगामी कालावधीमध्ये मेंदूबाबतही संशोधनाचे पुढचे पाऊल पडणार असल्याचे त्यांना वाटत आहे.