कर्नाटकातील बंडखोर आमदार ‘विधान सौध’ भवनात दाखल

बंगळुरू – कर्नाटकातील राजकीय नाट्याला आज सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी कलाटणी मिळाली आहे. आज सकाळी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांप्रमाणे कर्नाटकातील जेडीस-काँग्रेस आघाडीचे राजीनामा नाकारण्यात आलेले आमदार बंगळुरू येथील विधान सौध भवनामध्ये अध्यक्षांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपले राजीनामे सादर करण्यासाठी दाखल झाले आहेत.

तत्पूर्वी, आज सकाळी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये मुक्कामी थांबलेल्या आमदारांनी आपला मुक्काम हलवत ते दुपारच्या विमानाने बंगळुरूकडे रवाना झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.