नवी दिल्ली – हिट अँड रन तसेच रस्ते अपघातात मृत्यू पावलेल्या लोकांच्या कुटुंबीयांना मिळणाऱी भरपाई 25 हजार रुपये रकमेत वाढ करुन ती रक्कम दोन लाख रुपये करण्याचा प्रस्ताव सरकरने माडंला आहे. तेव्हा रस्त्यावर तुम्हाला कोणी टक्कर मारल्यानंतर टक्कर मारणारा पळून गेल्यास तुम्हाला जास्तीचे पैसे मिळू शकतात.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हिट अँड रन रस्ते अपघातग्रस्तांना भरपाईची रक्कम वाढवण्याची योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. यामध्ये रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना 50 हजार रुपये भरपाई देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना 12 हजार 500 रुपये भरपाई याआधी देण्यात येत होते. ते 50 हजार करण्यात आले आहे. तसेच अपघात मृत्यू झाल्यास 25 हजार रुपया वरुन ते 2 लाख रुपये करण्यात येणार आहे.
मिळालेल्या आकेवाडीनुसार देशात 2019 मध्ये 1 लाख 51 हजार 113 लोकांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी एका अधिकृत निवेदनात मंत्रालयाने म्हटले आहे की, हिट अँड रन अपघातग्रस्तांच्या भरपाईसाठी योजना बदलण्याची गरज आहे.