नवी दिल्ली – केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना कोविड-19 मुळे उद्भवलेल्या आव्हानाचा सामना करण्यासाठी रुग्णालये, प्रयोगशाळा, अलगीकरण कक्ष यासारख्या अतिरिक्त वैद्यकीय सुविधा स्थापन करण्यासाठी तसेच अस्तित्वात असलेल्या सुविधांचा विस्तार आणि उन्नतीसाठी वित्तीय सोयीसुविधांचा वापर करायला सांगितले आहे. या सुविधांमध्ये रुग्णांवर उपचार करण्यासाठी व्हेंटिलेटर, वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे (पीपीई), मास्क आणि औषधे यांचा पुरेसा साठा असणे आवश्यक आहे.