नवी दिल्ली – दिल्ली कॅपिटल्स संघाने आयपीएल 2023 साठी आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामासाठी डेव्हिड वॉर्नरकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर अक्षर पटेलकडे देखील उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. कार अपघाता झाल्यामुळे दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत संपूर्ण सीजन बाहेर असणार आहे. पंत पुढील सिजनमध्ये पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे.
वॉर्नरने यापूर्वी आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचे कर्णधारपद सांभाळले होते. त्याने 2016 मध्ये संघाला चॅम्पियन बनवले. 2022 मध्ये तो दिल्ली संघात सामील झाला. त्याला दिल्लीने 6.25 कोटी रुपयांना विकत घेतले. त्या सिजनमध्ये वॉर्नरने चांगली कामगिरी केली होती. त्याने 12 सामन्यात 48 च्या सरासरीने 432 धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 150.52 होता.
वॉर्नर यापूर्वी 2009 ते 2013 पर्यंत दिल्ली फ्रॅंचायझीचा भाग होता.अक्षर पटेलबद्दल सांगायचे तर, 2019 मध्ये दिल्लीने त्याचा संघात समावेश केला होता. तो फ्रॅंचायझीचा महत्त्वाचा सदस्य आहे. त्याने ऑल राउंडर म्हणून दमदार कामगिरी केली आहे. आयपीएलच्या या सिजनमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघ 1 एप्रिल रोजी लखनौ येथे लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध सामना खेळणार आहे.
असा असेल दिल्लीचा संघ
डेव्हिड वॉर्नर (कॅप्टन), अक्षर पटेल (व्हीसी), पृथ्वी शॉ, मनीष पांडे, फिलिप सॉल्ट, रायली रुसो, रिपल पटेल, रोवमन पॉवेल, सरफराज खान, यश धुल, मिचेल मार्श, ललित यादव, एनरिच नॉर्टजे, चेतन साकारिया, कमलेश नागरकोटी , खलील अहमद, लुंगी एन्गिडी, मुस्तफिजुर रहमान, अमन खान, कुलदीप यादव, प्रवीण दुबे, विकी ओस्तवाल, इशांत शर्मा, मुकेश कुमार.