पायाभूत क्षेत्राची उत्पादकता उणे 8.5%

नवी दिल्ली – ऑगस्ट महिन्यात ही पायाभूत क्षेत्राचे उत्पादकता कमी होऊन ती उणे 8.5 टक्‍के इतकी नोंदली गेली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून पायाभूत क्षेत्राची उत्पादकता शून्य टक्‍क्‍यांच्या खाली आहे. 

उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार पोलाद, तेल शुद्धीकरण, सिमेंट क्षेत्राची उत्पादकता कमी झाली आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात पायाभूत क्षेत्राची उत्पादकता उणे 0.2 टक्‍के इतकी होती. कोळसा आणि खते वगळता इतर क्षेत्राची उत्पादकता कमी झाली आहे.

एप्रिल ते ऑगस्टदरम्यान पायाभूत क्षेत्राची उत्पादकता उणे 17.7 टक्‍के नोंदणी गेल्यामुळे या वर्षाचा विकासदर मोठ्या प्रमाणात कमी होणे स्पष्ट झाले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.