बारामती – बारामती शहर व तालुक्यात 20 संक्रमित रुग्ण आढळून आल्याचे तपासणी अहवालात निष्पन्न झाले आहे. एकूण संख्या 212 वर पोहोचली आहे. (दि.5) प्रतीक्षेत असलेल्या 21 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी तालुक्यातील 18 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
त्यामध्ये शहरातील 14 व ग्रामीण भागातील 5 रुग्णांचा समावेश आहे. डोर्लेवाडी येथील एक रुग्ण, बऱ्हाणपूर येथील एक रुग्ण, वंजारवाडी येथील एक रुग्ण व गुणवडी येथील दोन रुग्णांचा समावेश आहे.
शहरांमधील प्रगतीनगरमधील दोन रुग्ण, महादेव मळा येथील दोन, तांदूळवाडी येथील एक, रुई येथील चार, आमराई येथील एक, कृषी देवतानगर येथील रुग्णाच्या संपर्कातील एक, खंडोबानगरमधील एक, हरिकृपानगर एक व शहरातील एकाचा समावेश आहे. निंबूत येथील एका कंपनीतील कामगार वसाहतीत दोन जणांचा अहवाल पुणे येथील प्रयोगशाळेमध्ये पॉझिटिव्ह आला आहे त्यामुळे एकूण संख्या 212 इतकी झाली आहे.