दिवसभरात 8 करोनाबाधितांचा मृत्यू
पुणे – शहरात करोना बाधितांच्या संख्येने रविवारी उच्चांक गाठत खळबळ उडवली होती. पण, सोमवारी 212 नवे बाधित सापडले आहेत. तर, करोनामुक्त झालेल्या 255 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर दिवसभरात आठ जणांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे.
रविवारी (दि.21) दिवसभरात 308 जणांचे नमुने घेण्यात आले. तर, आधीच्या नमुन्यांमधील 953 अहवाल प्रतिक्षेत होते. त्यामध्ये 212 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. दरम्यान, सोमवारी दिवसभरात 3,227 जणांचे नमुने घेण्यात आले.
दरम्यान, आतापर्यंत करोनामुक्त होऊन घरी सोडलेल्यांची संख्या आता 7,672 झाली आहे. सध्या शहरातील विविध रुग्णालयांत 4,496 बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 280 जणांची प्रकृती चिंताजनक असून, 55 जण व्हेंटिलेटर आहेत. तर, 225 बाधितांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सध्या 11,185 व्यक्ती विलगीकरणात आहेत.