#INDvWI : शिवमचे अर्धशतक; भारताचे विंडीसमोर १७१ धावांचे आव्हान

तिरूवनंतपुरम : अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने वेस्टइंडिजसमोर विजयासाठी १७१ धावांचे आव्हान ठेवले आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ७ बाद १७० धावा केल्या आहेत.

वेस्ट इंडिज कर्णधार कायरन पोलार्ड याने नाणेफेक जिंकून भारतीय संघास प्रथम फलंदाजीसाठी पाचरण केलं होतं. भारताची सुरूवात खराब झाली. ३.१ षटकात संघाची धावसंख्या २४ असताना खॅरी पिएरने हेटमायरकरवी लोकेश राहुलला झेलबाद करत भारतीय संघास पहिला झटका दिला. राहुल ११ धावांवर बाद झाला. त्यानंतर फलंदाजीस आलेला रोहित शर्मा दुस-या सामन्यातही अपयशी ठरला. रोहितला होल्डरने १५ धावावर त्रिफळाचित केल.

त्यानंतर शिवम दुबेने आक्रमक खेळ करत अर्धशतक पूर्ण केल. दुबेने ३० चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारासह ५४ धावाची खेळी केली. शिवम दुबे बाद झाल्यानंतर कोहली पहिल्या सामन्यासारखी खेळी करेल अस वाटत होतं पण त्याला केसरिक विल्यम्सने १९ धावांवर सिमन्सकरवी झेलबाद केलं. त्यानंतर रिषभ पंतने २२ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकारासह नाबाद ३३ धावा करत संघाची धावसंख्या २० षटकात १७० पर्यत नेली. जडेजाने ९ तर श्रेयस अय्यरने १० धावा केल्या.

वेस्ट इंडिजकडून गोलंदाजीत केसरिक विल्यम्स आणि हेल्डन वाॅल्शने प्रत्येकी २ गडी बाद केले. तर शेल्डन काॅट्रेल, जेसन होल्डर आणि खॅरी पिएरने प्रत्येकी १ गडी बाद केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)