मुंबई :- ऑस्ट्रलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी रवीचंद्रन अश्विन याची भारतीय संघात निवड झाल्यावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. मात्र, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने अश्विनच्या निवडीचे समर्थन केले आहे.
अश्विन गेल्या मोसमापासून एकदिवसीय सामने खेळला नसला तरीही त्याच्याकडे या स्तरावरच्या सामन्यांचा मोठा अनुभव आहे. सामन्यात निर्माण झालेली स्थिती कशीही असो तो क्षमतेचा पूर्ण वापर करत कामगिरी करतो. त्याने गेल्या काही वर्षांत आपल्या फलंदाजीनेही संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. त्यामुळेच ऑस्ट्रेलियासारख्या संघाविरुद्ध त्याची फलंदाजीच नव्हे तर ऑफ स्पिन गोलंदाजीही यशस्वी ठरेल, असे रोहितने म्हटले आहे.
एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे :-
पहिला सामना 22 सप्टेंबर, मोहाली
दुसरा सामना 24 सप्टेंबर, इंदूर
तिसरा सामना 27 सप्टेंबर, राजकोट