मोशीत इंदुरीकर महाराजांची बैलगाडीतून मिरवणूक

26 वर्षात जे घडल नाही ते या आठवड्यात घडल; इंदुरीकर महाराजांनी व्यक्त केली खंत

पिंपरी: सम-विषम तिथीवरुन मुलगा-मुलगीबाबत भाष्य करुन सध्या वादात अडकलेल्या इंदुरीकर महाराजांचा किर्तनाचा कार्यक्रम आज पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी येथे झाला. यावेळी मोशी येथील नागरिकांनी इंदुरीकर महाराजांची गावाच्या वेशीपासून ते किर्तनस्थळापर्यंत बैलगाडीतून वाजत-गाजत मिरवणूक काढून इंदुरीकर महाराजांना आपला पाठींबा दर्शविला.

या किर्तनात इंदुरीकर महाराजांनी सध्या असलेल्या वादावर भाष्य केले. ते म्हणाले की, मी महाराज होऊन 26 वर्ष झाली, पण 26 वर्षात झालं नाही ते आठवड्यात झालं. 26 वर्ष बोलतोय तेच बोललो, पण तेव्हा काही झालं नाही. आत्ता झालं. माझ्या बोलण्याचा विपर्यास केला. मी आधीच सांगतो माझं बोलणं तुमचा मुलगा म्हणून ऐका, तुमचा मित्र म्हणून ऐका, तरुणींनो बाहेर फिरता आलं पाहिजे, सौरक्षणाचे धडे घ्या आणि तरुणांनो मित्र तपासून घ्या, सोबत भावकी आणि नातेवाईकांपासून सावध रहा, असाही सल्ला इंदोरीकर महाराजांनी दिला

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.