काठमांडू : तेराव्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत गतविजेत्या भारतीय पुरूषांच्या व्हाॅलीबाॅल संघाची लढत आज (मंगळवार, ३ डिसेंबर) अंतिम फेरीत पाकिस्तानशी होणार आहे.
Indian Men’s volleyball team enters into the finals of 13th #SouthAsianGames; Defeats Sri Lanka in a thrilling first semifinal by 3-1 in Kathmandu, Nepal pic.twitter.com/YC6lFl3wDZ
— Doordarshan Sports (@ddsportschannel) December 1, 2019
काठमांडूत रविवारी झालेल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा ३-१(२७-२५,२५-१९,२१-२५,२५-२१)असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली, तर दुसरीकडे पाकिस्तानने बांगलादेशचा ( २५-१५, २५-११, २६-२४) पराभव करत स्पर्धेची अंतिम फेरी आठली.