इंदिरा गांधींना जयंती निमीत्त आदरांजली

नवी दिल्ली: देशाच्या दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्यांच्या 102 व्या जयंती निमीत्त देशभर आदरांजली वाहण्यात आली. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या सह कॉंग्रेसचे सर्व ज्येष्ठनेते आणि खासदार यावेळी शक्तीस्थळावरील त्यांच्या समाधीस्थानवर पुष्पांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित होते.

कॉंग्रेस पक्षाच्यावतीनेही त्यांना आदरांजली वाहण्यात आली असून पक्षाने आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे की इंदिराजींनी देशाच्या सुरक्षा, अर्थव्यवस्था आणि विदेशी धोरणा मध्ये जे योगदान दिले आहे, ते कायमच प्रेरणादायी आहे. राहुल गांधी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, मजबुत भारतासाठी इंदिराजींनी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्याकडे नेतृत्वाची एक मोठी शक्ती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जयंती निमीत्त इंदिराजींना आदरांजली अर्पण केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.