केवळ 22 टक्के जणांनाच नोकऱ्यांचे “कौशल्य’

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकलपनेतील “स्किल इंडिया मिशन’चा भाग असणाऱ्या पंतप्रधान कौशल्य विकास योजनेद्वारे 64. 27 लाख जणांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यापैकी 14 लाख 43 हजार जणांना नोकऱ्या मिळाल्या, अशी माहिती लोकसभेत देण्यात आली. हे प्रमाण सुमारे 22 टक्के आहे.

कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री आर. के. सिंग यांनी लेखी प्रश्‍नाला हे उत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये ही योजना सुरू केली. त्याद्वारे एक कोटी जणांना 2010 पर्यंत रोजगार मिळवून देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. सामान्य भारतीॅयांना चांगले आयुष्य जगता यावे म्हणून औद्यगिक गरजेचा कौशल्य विकास हे ध्येय ठरवण्यात आले होते. त्यामुळे या कार्यक्रमाच्या पंतप्रधानांच्या उद्दिष्टावर आता प्रश्‍नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे.

सध्या देशात सर्वाधिक म्हणजे 8.5 टक्के इतका बेकारी दर आहे. हा गेल्या 45 वर्षातील बेकारीचा उच्चांक आहे. 15 ते 29 वयोगटातील कौशल्य आत्मसात केलेले तरूण बेरोजगार असल्याचे या राष्ट्रीय सवेक्षण संस्थेच्या अहवालात नमूद केले आहे. या प्रश्‍नावर आता विरोधक सरकारला कसे कोंडित पकडतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here