Grammy Awards 2024 : यंदाच्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात भारताची मान उंचावली आहे. 05 फेब्रुवारी 2024 हा दिवस संगीत जगतासाठी खूप खास दिवस होता. यावेळी अनेक संगीतकारांच्या परफॉर्मन्सना ग्रॅमीसाठी नामांकन मिळाले होते, त्यापैकी भारतीय कलाकारांनी बाजी मारली. या अवॉर्ड सोहळ्यात गायक शंकर महादेवन आणि तबलावादक झाकीर हुसैन यांच्या ‘शक्ती’ या फ्युजन बँडने बाजी मारली आहे. ग्रॅमी अवॉर्ड 2024 मधील बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम अवॉर्ड त्यांना मिळाला आहे.
शंकर महादेवन आणि झाकीर हुसेन यांच्या ‘शक्ती’ बँडच्या ‘दिस मोमेंट’ या अल्बमला ‘सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक अल्बम’चा किताब मिळाला आहे. तर बासरीवादक राकेश चौरसिया यांनाही ‘सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक अल्बम’च्या ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सध्या सोशल मीडियावर ग्रॅमी अवॉर्ड सोहळ्यातील शंकर महादेवन आणि झाकीर हुसैन यांच्या शक्ती बँडला पुरस्कार मिळाला त्या क्षणाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
SHAKTI wins a #GRAMMYs #GRAMMYs2024 !!! Through this album 4 brilliant Indian musicians win Grammys!! Just amazing. India is shining in every direction. Shankar Mahadevan, Selvaganesh Vinayakram, Ganesh Rajagopalan, Ustad Zakhir Hussain. Ustad Zakhir Hussain won a second Grammy… pic.twitter.com/dJDUT6vRso
— Ricky Kej (@rickykej) February 4, 2024
झाकीर हुसैन – झाकीर हुसैन यांच्यासाठी 2024 हे वर्ष खूप खास ठरले. या तबला वादकाने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत 2 ग्रॅमी पुरस्कार जिंकले आहेत. पण 2024 मध्ये त्याने आपल्या टॅलेंटने सर्वांना इतके प्रभावित केले की त्यांना तीन ग्रॅमी अवॉर्ड जिंकले.
राकेश चौरसिया– देशातील दिग्गज बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचा मुलगा राकेश चौरसिया यानेही ग्रॅमीमध्ये आपली प्रतिभा दाखवली. त्याने दोन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये पुरस्कार पटकावले.
शंकर महादेवन– गायक-संगीतकार शंकर महादेवन यांच्यासाठीही हा पुरस्कार सोहळा खास ठरला. त्याला ‘दिस मोमेंट’साठी सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक अल्बमचा पुरस्कार मिळाला. या अल्बममध्ये एकूण 8 गाणी आहेत जी खूप आवडली होती. शंकर महादेवन यांच्या कारकिर्दीतील हा पहिला ग्रॅमी पुरस्कार आहे.
व्ही सेल्वागणेश- देशातील प्रसिद्ध तालवादक व्ही सेल्वागणेश यांनाही ग्रॅमी पुरस्कार मिळाला. दिस मोमेंट या म्युझिक अल्बमसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. त्यात 8 गाणी आहेत जी संगीतकाराने ‘शक्ती’ या बँडद्वारे संगीतबद्ध केली आहेत.
गणेश राजगोपालन– भारतीय संगीतकार गणेश राजगोपालन यांनाही हा पुरस्कार मिळाला. त्यांना शक्ती बँडच्या दिस मोमेंट अल्बमसाठी ग्रॅमी मिळाला आहे.