Dance Deewane 4 Winner| ‘डान्स दीवाने 4’ ह्या कार्यक्रमाचा नुकताच महाअंतिम सोहळा पार पडला. यंदाच्या या शोची ट्रॉफी गौरव-नितीन यांनी पटकावली आहे. फिनालेपर्यंत पाच जोड्या पोहचल्या होत्या. यात पाच जोड्यांना मागे टाकत गौरव शर्मा आणि नितिनने ‘डान्स दीवाने 4’च्या ट्रॉफीवर नाव कोरले आहे.
या शोच्या अंतिम फेरीत टॉप 6 फायनलिस्ट जोड्यांमध्ये ट्रॉफीसाठी खडतर स्पर्धा होती. सर्व स्पर्धकांनी दमदार कामगिरी केली होती. यामुळे ट्रॉफीसाठी चांगलीच चढाओढ पाहायला मिळाली. अखेर गौरव आणि नितिन या कार्यक्रमाचे विजेते ठरले.
गौरव 22 वर्षांचा असून तो दिल्लीचा आहे. तर १९ वर्षीय नितीन हा बेंगळुरूचा रहिवासी आहे. नितीन आणि गौरवने डान्स दिवानेसाठी स्वतंत्रपणे ऑडिशन दिले होते, परंतु नंतर एकत्र नृत्य सादर करू लागले आणि एकत्र विजेते म्हणून शोमधून बाहेर पडले. ट्रॉफीसोबतच गौरव आणि नितीन यांना २० लाखांचे बक्षीस मिळाले आहे. नितिन आणि गौरवला एकमेकांची भाषा समजत नसली तरी त्यांना नृत्याची भाषा मात्र चांगलीच समजते. दोघेही संपूर्ण सीझनमध्ये डान्सद्वारे एकमेकांशी बोलत राहिले. Dance Deewane 4 Winner|
आपल्या विजयाने गौरव शर्मा आणि नितीन खूप आनंदी आहेत. दोघांनीही बक्षिसाची रक्कम अर्धी वाटून घेतली आहे. विजयानंतर गौरव आणि नितीन यांनी बक्षीसाच्या रकमेचे काय करणार हे सांगितले. नितीन जिंकलेली रक्कम तो त्याच्या पालकांना देणार असल्याचे सांगतो. याशिवाय काही रक्कम दान करणार असल्याचेही त्याने सांगितले.
तर गौरव म्हणाला, ‘माझी स्वप्ने वेगळी आहेत. मी माझ्या मैत्रिणीसोबत बाहेर फिरायला जाणार आहे. तसेच माझ्या वडिलांनी माझ्यासाठी घेतलेले कर्ज मी फेडणार आहे आणि एक छोटी कार घेण्याची देखील माझी इच्छा आहे.” Dance Deewane 4 Winner|
दरम्यान, गौरव आणि नितीन, युवराज आणि युवंश, चिराश्री आणि चैनवीर, श्रीरंग आणि वर्षा, दिव्यांश आणि हर्ष, काशवी आणि तरनजोत यांच्यासोबतच या शोच्या ग्रँड फिनालेमध्ये पोहोचले होते.
हेही वाचा:
हनी सिंग-बादशाहमधील भांडण मिटले