Raj Thackeray| मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवस नाशिक दौऱ्यावर असणार आहेत. विशेष म्हणजे 19 आणि 20 जून रोजी असलेला राज ठाकरेंचा हा दौरा सहकुटूंब असणार आहे. नाशिक- त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान येत्या गुरूवारी होणार आहे. त्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहकुटूंब उपस्थित राहणार आहे. त्यानंतर ते पालखीची पुजा करून काही वेळ वारीत सहभागी होणार आहेत.
20 जूनला निवृत्तीनाथ महाराजाची पालखी पंढरीच्या दिशेनं रवाना होणार आहे, या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा हा दौरा असेल. त्यानंतर ते बारा ज्योर्तिलींगापैकी एक श्री त्र्यंबकेश्वराचे दर्शन देखील घेणार आहेत. नाशिकच्या संत निवृत्तीनाथ दिंडी सोहळ्यास प्रथमच राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. त्या दृष्टीने सर्व तयारी सुरू आहे. Raj Thackeray|
राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या दृष्टीने नाशिकमध्ये यासंदर्भात मनसेची पूर्वतयारी बैठक देखील पार पडली. संत निवृत्तीनाथ महाराजांची दिंडी 20 जून रोजी पंढरपूर येथे रवाना होणार असून 17 जुलै राेजी पंढरपूरला दिंडी पोहाेचेल. त्यानिमित्त आता वारकऱ्यांना देखील पंढरपुरच्या विठ्ठ्लाच्या भेटीची ओढ लागली आहे. दरवर्षी लाखो भावुक पायी वारीत मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. Raj Thackeray|
हेही वाचा: