मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट ; हवामानशास्त्र विभागाची माहिती

Maharashtra Rain Yellow alert । राज्यातील वातावरणात मागच्या काही दिवसापासून सातत्यानं बदल होतायेत. काही भागात चांगला पाऊस पडत आहे. तर काह भागात अद्याप चांगला पाऊस झाला नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, आज मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात हवामानशास्त्र विभागाकडून पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबदारी घ्यावी, असे आवाहनही प्रशासनानं केलंय.
दरम्यान, मागील तीन चार दिवसात राज्यातील काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावलीय. अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर काही ठिकाणी पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून येतंय. दरम्यान या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन देखील सतर्क आहे. प्रशासनाने सगळी तयारी देखील केली आहे. दरम्यान, ज्या भागात चांगला पाऊस झालाय, त्या भागात शेती कामांना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे.
हवमान विभागानं दिलेल्या माहितीनुसार. कोकणात फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मात्र, हा भाग सोडता संपूर्ण महाराष्ट्रात आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं या भागात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे.
विदर्भात मान्सूनच्या प्रगतीला ब्रेक Maharashtra Rain Yellow alert ।
सध्या मान्सूनने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व्यापला आहे. तर विदर्भाच्या काही भागात म्हणजे पश्चिम विदर्भाच मान्सून सक्रिय झाला आहे. मात्र, अद्याप मान्सूनने संपूर्ण विदर्भ व्यापला नसल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. विदर्भात मान्सूनच्या प्रगतीला सध्या ब्रेक लागला आहे. पुढच्या दोन ते तीन दिवसात मान्सून संपूर्ण विदर्भात सक्रिय होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये Maharashtra Rain Yellow alert ।
दरम्यान, ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे, त्या भागात शेती कामांना वेग आला आहे. शतकरी खरीपाची पेरणी करत आहे. मात्र, ज्या भागात चांगला पाऊस झाला नाही, त्या भागातील शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये, असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. दरम्यान, जोपर्यंत 100 मिलीमीटर पावसाची नोंद होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करु नये अशी माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे.





