भारताची गोलंदाजी जास्त भेदक – शमी

नवी दिल्ली – विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील सध्याच्या भारतीय क्रिकेट संघाची गोलंदाजी आज जगात भारी असल्याचे मत वेगवान गोलंदाज महंमद शमी याने व्यक्त केले आहे.

कपिल देव यांचा उदय झाला आणि वेगवान गोलंदाजी करण्याची प्रेरणा घेत अनेक युवा खेळाडूंनी कंबर कसली. अर्थात त्या काळानंतरही जे सरस गोलंदाज संघात होते ते वेगवान म्हणण्यापेक्षा मध्यमगती गोलंदाज होते असे म्हणावे लागेल. मात्र, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा यांच्यामुळे खरेखुरे वेगवान गोलंदाज गवसले, असा विश्‍वासही शमीने व्यक्त केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.