नवी दिल्ली: गुजरातमधील सूरत विमानतळाला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजेच सीआयएसएफची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडियाच्या मालकीचा असलेल्या या विमानतळाला आता सुरक्षेसाठी सीआयएसएफचे 360 जवान पुरवले जाणार आहेत.
हा विमानतळ बराच गजबजलेला विमानतळ आहे. तेथे दर महिन्याला तेथे 1 लाख 25 हजार विमाने येजा करीत असतात. तेथे ही सुरक्षा पुरवण्याचा निर्णय गृहमंत्रालयाने गेल्याच आठवड्यात घेतला आहे. सूरत विमानतळासह आता देशातील 64 विमानतळांवर सीआयएसएफ जवान सुरक्षा पुरवत आहेत.
मार्च महिन्यात या दलाकडे जम्मूच्या विमानतळाचही सुरक्षा पुरवण्यात आली होती. सीआयएसएफने आपल्या दलात विमानतळ सुरक्षाविषयक स्वतंत्र विभाग सुरू केला आहे. या दलाकडे सध्या एकूण 1 लाख 62 हजार जवान आहेत.