भारतीय महिला संघाचा सराव सामन्यात पराभव

ब्रिस्बेन – भारतीय महिला क्रिकेट संघाची ऑस्ट्रेलिया दौऱ्याची निराशाजनक सुरुवात झाली. कारण शनिवारी येथे 50 षटकांच्या सराव सामन्यात भारताला 36 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 278 धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव 242 धावांपर्यतच मजल मारू शकला.

ऑस्ट्रेलियाची सलामीवीर रॅचेल हेन्स (65), मॅग लॅनिंग (59) आणि बेथ मूनी (59) यांनी केलेल्या अर्धशतक खेळीच्या मदतीने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 9 बाद 278 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताला 50 षटकांत 7 बाद 242 धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू ऍलीसे पेरीने 38 धावांत 2 गडी बाद करत यशस्वीपणे पुनरागमन केले. तर स्टॅला कॅम्पबेलने 3 गडी बाद करत तिला सुरेख साथ दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.