दुबई – तेल अवीव विद्यापीठातील डॅन डेव्हिड फाऊंडेशनचा 10 लाख डॉलर्सचा हा पुरस्कार भारतातील सामाजिक कार्यकर्त्या गीता सेन यांना देबोरा डिनीझ यांच्यासमवेत विभागून मिळाला आहे. गीता सेन या भारतीय स्त्रीवादी विद्वान असून त्या रामलिंगस्वामी सेंटर ऑन इक्विटी अँड सोशल डेटरिनेंट्स ऑफ हेल्थ ऑफ इंडिया, पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया येथे प्राध्यापक आणि संचालक आहेत. त्या हार्वर्ड विद्यापीठात संलग्न प्रोफेसर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बेंगलोर येथे प्रोफेसर आणि डीएडब्ल्यूएनच्या जनरल को-ऑर्डिनेटर देखील आहेत.
डॉ. गीता सेन यांनी लोकसंख्या धोरण, प्रजनन आणि लैंगिक आरोग्य, लिंग समानता आणि महिलांचे मानवी हक्क तसेच गरिबी, मानवी विकास आणि कामगार बाजारपेठेवर 35 वर्षे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काम केले. त्यांच्या कामामुळे लोकसंख्या आणि विकासाच्या जागतिक पद्धतीत बदल होण्यास मदत झाली आहे. मुलगा होण्याच्या हव्यासातून अनेकदा बाळंतपणे सुरूच राहतात. स्त्रियांचे आरोग्य बिघडत जाते, त्याचबरोबर बालकांचेही कुपोषण होत असते.
लोकसंख्या, स्त्री आरोग्य धोरण या क्षेत्रात ज्या काही मोजक्या स्त्रीवादी संशोधक सक्रिय कामही करत आहेत त्यांपैकी एक म्हणजे प्रा. गीता सेन होय. त्या प्रतिष्ठेच्या डॅन डेव्हिड पुरस्कारातील यंदाच्या मानकऱ्यांपैकी एक आहेत. त्यांनी लोकसंख्या धोरण, प्रजनन व लैंगिक आरोग्य, महिला हक्क, दारिद्रय, कामगार बाजारपेठा, जागतिक प्रशासन अशा अनेक व्यापक विषयांत काम केले आहे. ज्ञरामलिंगस्वामी सेंटर ऑन इक्विटी अँड सोशल डिटर्मिनंट ऑफ हेल्थक्षच्या संचालक व ज्ञडेव्हलपमेंट अल्टरनेटिव्हज विथ विमेन फॉर न्यू इराक्षया संस्थेत समन्वयक आहेत.
संयुक्त राष्ट्रातही लोकसंख्या निधी संस्थेवर त्यांनी भारतीय संदर्भातील सल्लागार म्हणून काम केले होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रजनन आरोग्य व संशोधन या विषयावरील वैज्ञानिक व तंत्रज्ञान सल्लागार गटाच्या त्या सदस्य आहेत. भारत सरकारच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रमातील सुकाणू गटाच्या त्या सदस्य आहेत.