नवी दिल्ली – भारतीय रेल्वेने आजपासून अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. तर काही गाड्या रद्द केल्या आहेत. तुम्हीही रेल्वेचे तिकिट बुक केले असेल तर एकदा नक्की वेळापत्रक पाहा.
करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लाॅकडाऊन दरम्यान प्रवाशांची संख्या कमी झाली होती. त्यामुळे रेल्वेने अनेक रेल्वे रद्द केल्या होत्या. मात्र, आता देशात अनलाॅकची प्रक्रिया सुरु झाल्याने रेल्वेने आपल्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
पश्चिम रेल्वेने याबाबत ट्विट करून नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. तसेच काही विशेष गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती दिली आहे.
रेल यात्री कृपया ध्यान दें…
विशेष गाड़ियों का संचालन , आंशिक निरस्तीकरण.. pic.twitter.com/Lhgn6HKSHo
— North Central Railway (@CPRONCR) June 6, 2021
7 जूनपासून या गाड्यांचे वेळापत्रक बदलले –
- कानपुर सेंट्रल-नवी दिल्ली (02034) आणि नवी दिल्ली-कानपुर सेंट्रल आठवड्यात केवळ 4 दिवस चालेल. मगळवार, बुधवार आणि रविवारी बंद असेल.
-
ग्वालियर-भोपाल (04198) आणि भोपाल-ग्वालियर (04197) आठवड्यात केवळ पाच दिवस चालेल. रविवार आणि बुधवारी बंद असेल.
-
लखनऊ जं- आगरा फोर्ट (02179) आणि आगरा फोर्ट लखनऊ जं (02180) आठवड्यात पाच दिवस चालेल. शनिवार आणि रविवारी बंद असेल.
-
आगरा फोर्ट-अजमेर जं. आणि अजमेर जंक्शन – आगरा फोर्ट आठवड्यात पाच दिवस चालेल. शनिवार आणि रविवारी बंद असेल.
-
झांसी- आगरा कैंट, आगरा कैंट-झांसी, ईदगाह -बांदीकुई, आणि बांदीकुई-ईदगाह या दररोज चालतील.
-
याव्यतिरिक्त सूबेदार -देहरादून या गाड्यांमध्ये 9 जूनपासून बदल होणार आहे.
6 विशेष गाड्या तात्पुरत्या बंद –
-
(02823) भुवनेश्वर- नवी दिल्ली ही रेल्वेगाडी 11,14,17 आणि 18 जूनला रद्द करण्यात आली आहे. याशिवाय नवी दिल्ली – भुवनेश्वर ही गाडी 12,15,17, आणि 19 जूनला बंद ठेवण्यात आली आहे.
-
गाडी नं. 02825 भुवनेश्वर-नवी दिल्ली ही 16 जूनरोजी रद्द करण्यात आली आहे तर, गाडी नं. 02826 नवी दिल्ली- भुवनेश्वर 18 जूनरोजी रद्द आहे.
-
गाडी नं. 02855 भुवनेश्वर – नवी दिल्ली 12 आणि 19 जूनरोजी रद्द करण्यात आली आहे. तर गाडी नं. 02856 नवी दिल्ली – भुवनेश्वर 13 आणि 20 रोजी रद्द केली आहे.