नवी दिल्ली – भारतीय पत्रकार आणि पुलित्झर पुरस्कार विजेते दानिश सिद्धीकी यांची हत्या करण्यात आली आहे. ते अफगणिस्तानातील कंदहार येथे अफगाण स्पेशल फोर्ससोबत राहून फोटो जर्नलिस्ट म्हणून काम करत होते.
तालिबानमध्ये सुरू असलेल्या दहशतवादी कारवाया जगापुढे मांडण्याचं काम दानिश करत होते. हे काम करत असतानाच त्यांची हत्या झाली.
दहशतवाद्यांनी अफगाण स्पेशल फोर्सच्या तुकडीवर हल्ला केला होता. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे अफगाण स्पेशल फोर्सला प्रतिकार करण्यासाठी वेळ मिळाला नाही. या काळात दहशतवाद्यांनी सिद्धीकी यांची हत्या केली. दानिश रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या दिल्ली ब्युरोतील मुख्य फोटो जर्नालिस्ट होते.
अफगानिस्तानचे राजदूत फरीद ममूनद्जे यांनी दानिश यांची हत्या झाल्याचे ट्विट करून सांगितलं. याआधी गेल्या महिन्यात १३ जूनला झालेल्या हल्ल्यातून दानिश थोडक्यात बचावले होते.
Deeply disturbed by the sad news of the killing of a friend, Danish Seddiqi in Kandahar last night. The Indian Journalist & winner of Pulitzer Prize was embedded with Afghan security forces. I met him 2 weeks ago before his departure to Kabul. Condolences to his family & Reuters. pic.twitter.com/sGlsKHHein
— Farid Mamundzay फरीद मामुन्दजई فرید ماموندزی (@FMamundzay) July 16, 2021
मुळचे मुंबईकर असलेले दानिश ४० वर्षांचे होते. त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घटनांचे वार्तांकन केलं आहे. त्यांना पुलित्झर पुरस्कारही मिळाला होता.