भयंकर! तालिबान्यांनी दानिशला आधी गोळ्या घातल्या नंतर डोक्यावरून गाडी घातली

नवी दिल्ली – भारतीय पत्रकार आणि पुलित्झर पुरस्कार विजेते दानिश सिद्धीकी यांची हत्या करण्यात आली आहे. ते अफगणिस्तानातील कंदहार येथे अफगाण स्पेशल फोर्ससोबत राहून फोटो जर्नलिस्ट म्हणून काम करत होते.

तालिबानमध्ये सुरू असलेल्या दहशतवादी कारवाया जगापुढे मांडण्याचं काम दानिश करत होते.  हे काम करत असतानाच त्यांची हत्या झाली. आता या हत्येबाबत आणखी एक भयंकर माहिती समोर आली आहे. दानिश यांना गोळ्या घालून त्यांची हत्या केल्यानंतर त्यांच्या डोक्यावर तालिबान्यांनी गाडी घालण्यात आली.

दानिश  यांच्या डेथ सर्टिफिकेटमध्येही गोळी लागल्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. पण, आता या हत्येबाबत आणखी एक भयंकर माहिती समोर आली की, दानिश सिद्दीकी यांना फक्त गोळीच मारण्यात आली नाही, तर तालिबानच्या दहशतवाद्यांनी त्यांचे डोके कारखाली चिरडल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, दहशतवाद्यांनी अफगाण स्पेशल फोर्सच्या तुकडीवर हल्ला केला होता. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे अफगाण स्पेशल फोर्सला प्रतिकार करण्यासाठी वेळ मिळाला नाही. या काळात दहशतवाद्यांनी सिद्धीकी यांची हत्या केली. दानिश रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या दिल्ली ब्युरोतील मुख्य फोटो जर्नालिस्ट होते.

अफगानिस्तानचे राजदूत फरीद ममूनद्जे यांनी दानिश यांची हत्या झाल्याचे ट्विट करून सांगितलं.  याआधी गेल्या महिन्यात १३ जूनला झालेल्या हल्ल्यातून दानिश थोडक्यात बचावले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.