ओमानच्या विजयात भारतीय जतिंदर चमकला

अल अमिरात (ओमान) – लुधियानाच जन्मलेला भारतीय जतिंदर सिंगच्या नाबाद 73 धावांच्या खेळीने ओमानने विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत पापुआ न्यु गिनी संघाचा 10 गडी राखून पराभव केला. जतिंदरची 42 चेंडूंतील नाबाद खेळी आणि त्याला सलामीला अकिब इलियाझची (नाबाद 50 मिळालेली साथ यामुळे ओमानने 130 धावांचे आव्हान 13.4 षटकांतच पूर्ण केले.

पापुआ न्यु गिनी संघाचा एकही गोलंदाज ओमानच्या सलामीच्या जोडीस बाद करण्यात यश आले नाही. जतिंदरने आपल्या अशाच फटकेबाजीतील सातत्याने ओमानला पात्रता फेरीत यश मिळवून दिले होते. त्या स्पर्धेत त्याने सर्वाधिक धावा केल्या होत्या.

त्यापूर्वी, कर्णधार असाद वाला याच्या अर्धशतकी खेळीने पापुआ न्यु गिनी संघाला किमान धावसंख्या उभारता आली. प्रतिस्पर्धी कर्णधार झीशान मकसूद याने 20 धावांत 4 गडी बाद करताना पापुआ न्यु गिनी संघाला 9 बाद 129 असे रोखले. झीशानच्या डावखुऱ्या फिरकीने अचूक कामगिरी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.