“हॉडी मोदी’ कार्यक्रमासाठी अमेरिकेतील भारतीय उत्सुक

ह्युस्टन – अमेरिकेत ह्युस्टन इथे होणाऱ्या “हाऊडी मोदी’ या कार्यक्रमासाठी आणि संयुक्‍त राष्ट्राच्या अधिवेशनाल उपस्थित राहण्याठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिकेला रवाना झाले. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या “हाऊडी मोदी’ या कार्यक्रमासाठी 50,000 प्रेक्षक येण्यास तयार आहेत. हे पोप व्यतिरिक्‍त निवडून आलेल्या परदेशी नेत्याचे अमेरिकेतील आतापर्यंतचे सर्वांत मोठे एकत्रीकरण आहे.

तीन तासांचा “हाऊडी मोदी’ कार्यक्रमात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधान मोदींसमवेत सामील होतील. या कार्यक्रमाचे आयोजन बेयॉन्स, मेटलिका, यू 2 या स्टारचे कार्यक्रम झालेल्या अमेरिकेतील सर्वात मोठ्या एनआरजी फुटबॉल स्टेडियमवर करण्यात आले आहे. शुक्रवारी पहाटे भारतीय राजदूत हर्ष व्ही.श्रींगला यांनी एनआरजी स्टेडियमवरच्या कार्यक्रमाच्या तयारीची पहाणी केली. या कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू आहे आणि हा संस्मरणीय कार्यक्रम होण्यासाठी 1,500 हून अधिक कार्यकर्ते 24 तास कार्यरत आहेत.

शुक्रवारी एनआरजी स्टेडियमवर एका कार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, त्यात 200 हून अधिक गाड्यांनी भाग घेतला आणि दोन्ही देशांमधील मैत्री दर्शविण्यासाठी भारत आणि अमेरिकेचे ध्वज फडकावले. ‘नमो अगेन’ टी शर्ट घातलेले आयोजक आणि कार्यकर्यांनी “नमो अगेन’ चा जयघोष केला आणि पंतप्रधान मोदींचे मनापासून स्वागत करण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

टेक्‍सास इंडिया फोरमचे प्रवक्ते प्रीती डावरा, गितेश देसाई आणि रिषी भुतडा यांनी या कार्यक्रमाचे वेळापत्रक, कार्यक्रमाची रुपरेषा, कार्यक्रमाकडून काय अपेक्षा करावी आणि ह्यूस्टनला अशा मेगा कम्युनिटी कार्यक्रमासाठी का निवडले गेले याची माहिती दिली.

हा कार्यक्रम अमेरिका आणि भारत यांच्या संस्कृतीचा आणि एकात्मतेचा भव्य उत्सव आहे, जिथे उपस्थित असलेले लोक अमेरिकेतील 30 लाखाहूनही अधिक भारतीय अमेरिकन मोदींचे अमेरिका-भारत संबंधांबद्दल बोलणे ऐकतील आणि त्यासंबंधीचा आपला विचार मांडतील.ऐतिहासिक फेरनिवडीनंतर दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याने भारताची सतत वाढ आणि प्रगती मोदींकडून व्हावी, अशीच या नागरिकांची अपेक्षा आहे, डावरा म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.