Government job 2024 : जर तुम्ही इंजिनीअरिंग केलं असेल आणि नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. NALCO ने 277 पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे. नोटिफिकेशननुसार, GATE 2023 स्कोअर असलेले पात्र उमेदवार NALCO च्या अधिकृत वेबसाइट nalcoindia.com द्वारे या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्जाची प्रक्रिया ४ मार्चपासून सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २ एप्रिल आहे. | Government job 2024
रिक्त जागा तपशील
GATE 2023 द्वारे 277 पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी पदे भरण्यासाठी ही भरती मोहीम राबविण्यात येत आहे. जाणून घेऊयात कोणत्या ब्रांचसाठी किती जागा भरणार.
मैकेनिकल : 127
इलेक्ट्रिकल : 100
इन्स्ट्रुमेंटेशन : 20
मेटलॉर्जी : १०
केमिकल : 13
केमेस्ट्री : 7
अर्ज फी | Government job 2024
या पदांसाठी सामान्य, OBC आणि EWS उमेदवारांसाठी अर्ज शुल्क रुपये 500 आहे. विभागीय उमेदवारांसह इतर सर्व उमेदवारांना 100 रुपये भरावे लागणार आहेत.
निवड प्रक्रिया | Government job 2024
उमेदवारांची अंतिम निवड GATE 2023 मध्ये मिळालेल्या गुणांवर आणि मुलाखतीतील त्यांच्या कामगिरीवर आधारित असेल. GATE गुण आणि मुलाखतीला दिलेले वेटेज अनुक्रमे 90% आणि 10% आहे.
वयोमर्यादा किती ?
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 2 एप्रिल रोजी 30 वर्षे असावे.
ज्या उमेदवारांना या भरतीशी संबंधित अधिक माहिती हवी आहे ते अधिकृत वेबसाइटला भेट देऊन NALCO भरती अधिसूचना पाहू शकतात. | Government job 2024