IND vs SA T20 – भारतीय संघ आणि साऊथ आफ्रिका संघांमध्ये दुसरा टी-२० सामना आज खेळाला जात आहे. सामन्याच्या सुरुवातीला आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवूमा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय फलंदाजांनी आफ्रिकेच्या कर्णधाराचा निर्णय चुकीचा ठरवला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना डोंगराएव्हड्या २३७ धावांच लक्ष्य आफ्रिकेसमोर ठेवलं आहे. या सामन्यात केएल राहुल आणि रोहित शर्मा फलंदाजी करत असताना एक विचित्र घटना घडली.
भारतीय संघाची धावसंख्या ६८ धावांवर एकही गाडी बाद नसताना मैदानात अचानक सापाने दर्शन दिले. सर्वात अगोदर केएल राहुलचे याकडे लक्ष गेले आणि त्याने ही बाब पंचांच्या निदर्शनास आणून दिली. पंचांनी मैदानावरील कर्मचाऱ्यांना सांगून सापाचा बंदोबस्त केला. यादरम्यान खेळ १० मिनिटांसाठी थांबविण्यात आला होता. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
सामन्यात भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना साऊथ आफ्रिकेसमोर २३७ धावांचे लक्ष्य ठेवले. भारताकडून फलंदाजीत सूर्यकुमार यादवने तुफानी फटकेबाजी करत अर्धशतक फटकावले. सलामीला दोन्ही फलंदाजांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. सूर्यकुमार आणि विराट कोहली यांच्यात दमदार भागीदारी पाहायला मिळाली. शेवटी दिनेश कार्तिकनेही संघाचा डाव धडाकेबाज अंदाजात संपवला. ( India vs South Africa T20I Snake On the Ground During Match Video Viral )
#Guwahati Cricket Ground…play stopped for a bit after a #snake was spotted on the field 😀
Game halted for a snake 🐍 It is just like Australian suburb grounds 👍🏽 #INDvsSA
#INDVSA #T20I pic.twitter.com/UX1iZIPT6n— Aji Rasheed Ali اجی رشید علی (@ajirasheed) October 2, 2022
फलंदाजी करताना केल राहुल ५७ धावा, रोहित शर्मा ४३ धावा, विराट कोहली ४९ धावा, सूर्यकुमार यादव ६१ धावा आणि दिनेश कार्तिक १७ धावा यांनी आफ्रिकेच्या गोलंदाजांना चांगलेच आभाळ दाखवले. भारताने २० षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात २३७ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात आफ्रिकेची स्थिती बातमी लिहिली त्या वेळेपर्यंत ५ धावांवर २ गडी बाद अशी होती. भारताकडून अर्शदीप सिंगने एकाच षटकात २ गडी बाद केले.