India vs Australia 1st T20 Cricket Match Live Score : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. उभय संघांमधील पहिला सामना विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. भारताचा नवा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑस्ट्रेलियानं जोश इंग्लिसच्या वादळी शतकी आणि स्टीव स्मिथ याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर निर्धारित 20 षटकात 3 बाद 208 धावा केल्या असून भारतीय संघासमोर विजयासाठी 209 धावांचे मोठं आव्हान ठेवलं आहे. ऑस्ट्रेलियाकडून जोश इंग्लिसने शानदार शतक झळकावले. त्याने 50 चेंडूत 110 धावा केल्या. या खेळीत त्याने 11 चौकार आणि आठ षटकार मारले.
इंग्लिसने 220.00 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. त्याने स्टीव्ह स्मिथसोबत दुसऱ्या विकेटसाठी 130 धावांची भागीदारीही केली. स्मिथने 41 चेंडूत 8 चौकारासह 52 धावांची खेळी खेळली. टीम डेव्हिडने नाबाद 19 धावा केल्या. मॅथ्यू शॉर्ट 13 धावा करून बाद झाला. मार्कस स्टॉइनिसने नाबाद सात धावा केल्या.
S. Sreesanth ! भारताचा माजी क्रिकेटपटू श्रीशांत पुन्हा एकदा वादात; केरळमध्ये पोलिसांनी…
भारताकडून प्रसिध कृष्णा (4 षटकात 50 धावा) आणि रवी बिश्नोई यांनी (4 षटकात 54 धावा) प्रत्येकी एक विकेट घेतली. अक्षर पटेल (4 षटकात 32), मुकेश कुमार (4 षटकात 29) आणि अर्शदीप सिंग (4 षटकात 41) यांना विकेट घेण्यात अपयश आले.