IND W vs AUS W 2nd T20 Live Cricket Score : भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांमधील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमीत खेळवला जात आहे. भारताने या मैदानावरील पहिला टी-20 सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे . आता टीम इंडियाची नजर दुसरी टी-20 जिंकून मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेण्याकडे आहे. भारताने यापूर्वी 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाला त्यांच्या भूमीवर तीन सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने पराभूत केले होते.
भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने टाॅस जिंकला आहे. कर्णधार एलिसा हीली हिनं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून भारतीय महिला संघास प्रथम फलंदाजी करण्यास पाचारण केलं आहे. भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया डार्सी ब्राउनच्या जागी किम गर्थला संधी देण्यात आली आहे.
INDW vs AUSW 2nd T20 : ऑस्ट्रेलियानं Toss जिंकला; कर्णधार एलिसानं घेतला ‘हा’ निर्णय…
ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन : एलिसा हीली (कर्णधार/यष्टीरक्षक), बेथ मूनी, ताहलिया मैकग्राथ, एलिसे पेरी, एशले गार्डनर, फोएबे लिचफील्ड, ग्रेस हैरिस, एनाबेल सदरलैंड, जॉर्जिया वेयरहैम, किम गर्थ, मेगन शुट्ट.
2nd T20I. Australia XI: A. Healy (C/ WK), B. Mooney, T. McGrath, E. Perry, A. Gardner, P. Litchfield, G. Harris, A. Sutherland, G. Wareham, M. Schutt, K. Garth. https://t.co/pKJVZmOecC #INDvAUS @IDFCFIRSTBank
— BCCI Women (@BCCIWomen) January 7, 2024
भारताची प्लेइंग इलेव्हन : स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, रेणुका ठाकूर सिंग, तितास साधू.
🚨 Here’s #TeamIndia‘s Playing XI for the 2⃣nd #INDvAUS T20I 🔽
Follow the Match ▶️ https://t.co/ar0sCktbHa@IDFCFIRSTBank pic.twitter.com/X3WSHlZQEJ
— BCCI Women (@BCCIWomen) January 7, 2024
पहिल्याच सामन्यात केली होती दमदार कामगिरी…
एकदिवसीय मालिकेतील तिन्ही सामने गमावल्यानंतर, भारतीय महिला संघाने पहिल्या टी-20 सामन्यात खेळाच्या प्रत्येक विभागात चांगली कामगिरी केली आणि ऑस्ट्रेलियाचा नऊ गडी राखून पराभव केला. या सामन्यात भारतीय संघाने क्षेत्ररक्षणात चपळता तर दाखवलीच पण त्यांच्या गोलंदाजांनीही ऑस्ट्रेलियन फलंदाजांना मोकळेपणाने खेळू दिले नाही.
भारतासमोर 142 धावांचे लक्ष्य होते, ते भारतीय संघानं शफाली वर्मा (नाबाद 64) आणि स्मृती मानधना (54) यांच्यातील पहिल्या विकेटसाठी केलेल्या 137 धावांच्या भागीदारीच्या जोरावर सहज गाठले.