मुंबई : जगात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. जगभरातील संशोधक या विषाणूवर लस शोधण्यासाठी दिवसरात्र एक करत आहेत. जगभरात कोरोनाचे 68.44 लाख रुग्ण झाले आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात जीवघेण्या कोरोनाची लागण 6,844,705 लाख लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या 3 लाख 98 हजार वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 3,348,831 रुग्ण बरे झाले आहेत.
वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात सहाव्या स्थानावर आला आहे. भारतात कोविडचे 236,184 रुग्ण आहेत. तर 6,649 बळी कोरोनामुळे गेले आहेत. सध्या भारतात 116,302 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 113,233 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.
जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत 19,65,708 जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय. तर 111,390 लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. अमेरिकेनंतर यूकेमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यूकेत 40,261 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर तिथं कोरोनाबाधितांची संख्या 283,311इतकी आहे. अमेरिकेनंतर ब्राझील कोरोनाबाधितांच्या आकड्यांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
ब्राझीलमध्ये 646,006 कोरोनाबाधित आहेत तर 35,047 लोकांचा मृत्यू झालाय. स्पेनमध्ये कोविड-19मुळं 27,134 लोकांचा मृत्यू झाला आहे. 283,311 लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली तिसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 33,774 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 234,531 हजार इतका आहे.