INDW vs AUSW 2nd ODI – वानखेडे मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या महिलांच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही भारताची हाराकिरी कायम राहिली. महिला ब्रिगेडने जवळपास जिंकलेला हा सामना अखेरच्या वेळी अवघ्या ३ धावांनी गमावला. यासह भारताने घरच्या मैदानावरील एकदिवसीय मालिकाही गमावली आहे. सामन्यातील पराभवमुळे दिप्ती शर्माने दिलेली अष्टपैलू झुंज व रिचा घोषची ९६ धावांची खेळीही व्यर्थ ठरली.
२५९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ ५० षटकांत ८ गडी गमावून केवळ २५५ धावांपर्यंत मजल मारू शकला. भारताकडून ऋचा घोषसह जेमिमा रॉड्रिग्स(४४), स्मृती मानधना व दिप्ती शर्माने २४ धावांची खेळी खेळली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि ५० षटकात ८ विकेट गमावत २५८ धावा केल्या. सलामीवीर फोबी लिचफिल्डने संघाकडून सर्वात मोठी ६३ धावांची खेळी खेळली. याशिवाय एलिसा पेरीने ५० धावा करत संघाला २५० धावांचा टप्पा ओलांडून दिला. यानंतर, उर्वरित काम गोलंदाजांनी केले, ज्यांनी भारताला २५९ धावा करण्यापासून रोखले. रिचा घोष फलंदाजी करत असताना टीम इंडिया सहज जिंकेल असं वाटत होतं, पण रिचाच्या विकेटनंतर विजय ऑस्ट्रेलियाच्या हातात गेला.
ऋचा घोषने जेमिमाह रॉड्रिग्ससोबत तिसऱ्या विकेटसाठी ८८ धावांची (१०८ चेंडू) भागीदारी केली, जी ३४व्या षटकात जेमिमाहच्या विकेटने मोडली. जेमिमाने 3 चौकारांच्या मदतीने ४४ धावांची खेळी केली. त्यानंतर ३६व्या षटकात कर्णधार हरमनप्रीत कौर वैयक्तिक ५ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतली. यानंतर ४४व्या षटकात ऋचा घोषची विकेट पडली, तिने १३ चौकारांच्या मदतीने ९६ धावा केल्या. रिचाच्या विकेटनंतर टीम इंडिया बॅकफूटवर आली आणि एकापाठोपाठ विकेट्स गमावल्या.
भारताने सोडले सात झेल
ऑफस्पिनर दीप्ती शर्माने पाच गडी बाद करत ऑस्ट्रेलियाचा धावगती रोखली, परंतू भारताच्या खेळाडूंनी रटाळ क्षेत्ररक्षण करताना सामन्यात तब्बल सात झेल सोडले. त्याचमुळे आठ विकेट्सच्या मोबदल्यात ऑस्ट्रेलिया २५८ धावांपर्यंत मजल मारू शकला. कोरड्या आणि वळणावळणाच्या खेळपट्टीचा पुरेपूर फायदा घेत दीप्तीने १० षटकांत ३८ धावांत ५ बळी घेतले. एलिसा पेरी (५० धावा), बेथ मुनी (१० धावा), ताहलिया मॅकग्रा (२४ धावा), जॉर्जिया वॉरहॅम (२२ धावा) आणि अॅनाबेल सदरलँड यांच्या विकेट घेत दीप्तीने कारकिर्दीत दुसऱ्यांदा पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलियाः ५० षटकांत ८ बाद २५८ (फोबी लिचफिल्ड ६३, एलिसा पेरी ५०, तहलिया मॅकग्रॉथ २४, एलना किंग २८; दिप्ती शर्मा ५-३८, स्नेह राणा १-५९, श्रेयांका पाटील १-४३, पुजा वस्त्राकार १-५९) वि. भारतः ५० षटकांत ८ बाद २५५(स्मृती मानधना ३४, रिचा घोष ९६-११७ चेंडू, जेमिमाह रॉड्रीग्स ४४, दिप्ती शर्मा नाबाद २४; अँनाबेल साउदरलँड ३-४७, जॉर्जिया वॉरहॅम २-३९, किम गर्थ १२४, अँश्ले गार्डनर १-४६)