कोलंबो – भारताने शनिवारी श्रीलंकेला क्रेडिट लाइन सुविधेअंतर्गत आणखी 40,000 मेट्रिक टन डिझेल प्रदान केले आहे. गेल्या महिन्यात, भारताने श्रीलंकेला इंधन आयात करण्यासाठी पाचशे दशलक्ष डॉलर्सची क्रेडिट लाइन दिली होती.
त्याच बरोबर आज आणखी 40 हजार मेट्रिक टन डिझेल कोलंबोला पाठवण्यात आले आहे. हे डिझेल श्रीलंकेत पोहचले आहे अशी माहिती भारतीय उच्चायुक्तांनी ट्विटरवर दिली. भारताकडून संकटग्रस्त श्रीलंकेसाठी तांदूळ, औषधे आणि दुधाची पावडर अशा तातडीच्या मदतीच्या वस्तुही पाठवण्याचे ठरवले असून या मदत पुरवठ्याने भरलेले भारतीय जहाज रविवारी कोलंबोला पोहोचणार आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी बुधवारी चेन्नईहून श्रीलंकेला रवाना करण्यात आलेल्या जहाजाला हिरवा झेंडा दाखवला.यात एकूण 45 कोटी रूपयांच्या वस्तुंचा समावेश आहे.