नवी दिल्ली, दि. 7 – देशात गेल्या 24 तासांत करोनाचे पुन्हा चार लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळून आले असून आज एकूण 4 लाख 14 हजार 188 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे भारतातीाल एकूण करोना रुग्णांची संख्या आता 2 कोटी 14 लाख 91 हजार 598 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात करोनामुळे एकूण 3915 रुग्ण दगावल्याने मृतांची एकूण संख्या आता 2 लाख 34 हजार 083 इतकी झाली आहे.
तसेच देशातील एकूण सक्रिय बाधितांची सध्याची संख्या 36 लाख 45 हजार 164 इतकी झाली आहे. रुग्णांचा रिकव्हरी रेट 81.95 टक्के इतका आहे.गेले काही दिवस रुग्णांची संख्या सतत चार लाखांपेक्षाही अधिक असल्याने करोनाच्या स्थितीत जराहीं फरक पडलेला नसल्याचे दिसून आले असून विविध राज्यांची आरोग्य यंत्रणा या स्थितीशी अत्यंत कसोशिचा मुकाबला करीत आहे.