शहरातील चौकांना रंगरंगोटी करून दिला स्वच्छतेचा संदेश
इतिहासात पहिल्यांदाच कचरा डेपोला झळाळी
रेडा (प्रतिनिधी):- इंदापूर नगर परिषदेने राज्यात नव्हे तर देशात.शहरात दमदार स्वच्छता मोहीम राबवून आपला नावलौकिक केला स्वच्छ सर्वेक्षणात देशात दहावा येण्याचा मान नगरपरिषदेने पटकावला.त्यामुळे तब्बल 15 कोटी रकमेचा पुरस्कार नगर परिषदेला प्राप्त झाला, एवढ्याच समाधान यावर न थांबता आत्ता फाइव स्टार मानांकनासाठी नगरपरिषदेने स्वच्छता मोहिमेत वेग वाढवून वाटचाल सुरू केली आहे.त्यामुळे स्वच्छ व सुंदर इंदापूर नागरिकांना दिसत आहे.
स्वच्छ विचाराच्या शब्दाने बोलक्या केल्या भिंती
इन्दापुर नगरपरिषदेने स्वच्छ व सुंदर इंदापूर करण्यासाठी शहरातील सार्वजनिक असणाऱ्या भिंती यावरती स्वच्छतेसंदर्भात चांगले विचार रेखाटून स्वच्छ विचाराच्या शब्दाने अगदी बोलक्या भिंती निर्माण केल्या आहेत. कचरा डेपो परिसरात तर कचरा डेपो आहे की आनंदयात्री याचा फरक कळत नाही त्यामुळे स्वच्छतेचा वेग नगरपरिषदेने स्पर्धेसाठी न करता कायम सुरु ठेवावा अशी अपेक्षा इंदापूर शहरवासीयांनी केलेली आहे.
यासंबंधी अधिक वृत्त असे की,इंदापूर नगरपरिषद ही हागणदारीमुक्त होऊन ओडीआय प्लस हे प्रमाणपत्र मिळवणारी ठरली आहे.येथील नागरिकांना सुख-सुविधा प्राप्त करून देण्यासाठी नगरपरिषदेचे कारभारी धडपड करताना दिसत आहेत.या नगर परिषदेने तीन स्टार आत्तापर्यंत मिळवले आहेत त्यामुळे देशात दहावा क्रमांक नगरपरिषदेला मिळवता आला. यामुळेच नगरपालिकेला घवघवीत बक्षिसाची रक्कम नागरिकांना सुखसुविधा देण्यासाठी वापरता येत आहे याच बक्षिसाच्या रकमेतून साडेसात कोटीचा पहिला हप्ता नगर परिषदेच्या हद्दीतील विकास कामांसाठी प्राप्त झाला आहे यातूनच शहराचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
मुख्याधिकाऱ्यांची गैरहजर नाही
इंदापूर नगर परिषदेचे तात्कालीन मुख्याधिकारी रामनिवास झंवर हे नगर परिषदेचा कारभार पुण्यातून व इतर भागातून मागील काही महिन्यापूर्वी हाकत होते मात्र याच मुख्य अधिकारी यांच्या विरोधात तब्बल दोन वर्षापासून नगर परिषदेच्या मुख्य कार्यालयासमोर माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांचे कारवाई संदर्भात उपोषण आंदोलन सुरू आहे.हे आंदोलन झंवर यांची बदली झाली तरीदेखील सुरूच राहिले आहे,परंतु मागील काही महिन्यापासून या नगर परिषदेचा कारभार पाहण्यासाठी रुजू झालेले मुख्याधिकारी डॉक्टर प्रदीप ठेंगण हे नगरपरिषदेचा कारभार वेगवान हवा नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी दिवसभर नगरपरिषदेच्या कार्यालयात कार्यरत असतात,वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मिटिंग सोडता डॉक्टर ठेंगण हे गैरहजर दिसत नाहीत त्यामुळे अनेक जुन्या या तक्रारींचा निपटारा होऊ लागला आहे.
नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा, नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रदीप ठेंगणं, व व सर्व नगरसेवकांनी शहरांमध्ये वृक्ष लागवडीत कमतरता नसूनही म्हणून पाच हजाराच्या वरती शहराच्या हद्दीत वृक्षलागवड करून हरित इंदापूर निर्माण केले आहे. तर कचरा मुक्त शहर होण्यासाठी ओला कचरा,सुका कचरा हा दोन प्रकारे कचरा संकलन करून यापासून सेंद्रिय खताची निर्मिती सुरू केले आहे यामुळे या सेंद्रिय खत विक्रीतून नगरपालिकेला अर्थकारण मजबूत होण्यासाठी मोलाची मदत होताना दिसते आहे.
नगर परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच कचरा डेपोला झळाळी मिळाले असून या कचरा डेपोचे विस्तारीकरण नूतनीकरण वेगाने सुरू आहे. याठिकाणी पत्रा शेड मध्ये सुका कचरा वेगळा व ओला कचरा वेगळा यामध्ये चप्पल बूट रद्दी कपडे केस पत्रा लोखंड याचे वेगळे पेंडल करण्यात आलेले आहेत.रात्रंदिवस कचरा वाहतूक करणाऱ्या बारा गाड्या सुरू असल्याने शहरात कोठेही कचऱ्याचे ढीग आढळून येत नाहीत,त्यामुळे कचऱ्यासाठी प्रसिद्ध असणारे इंदापूर कचरामुक्त होताना दिसते आहे.
प्रत्येक कामासाठी नवे रजिस्टर
तत्कालीन मुख्याधिकारी यांनी संबंधित कालावधीतील कामे करण्यासाठी प्रसिद्ध होणाऱ्या निविदा ह्या नागरिकांना दिशाभूल करणाऱ्या देऊन कामे करण्याचा नवा पायंडा घातला होता मात्र नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी डॉक्टर ठेंगण यांनी थेट शासनाच्या आदेशाप्रमाणे प्रत्येक कामासाठी नवे रजिस्टर नगर परिषदेच्या कार्यालयात सुरू केले असल्याने मॅनेज अधिकाऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे.त्यामुळे मॅनेज प्रकार बंद पडण्याच्या मार्गावर आला आहे.
नगरपरिषदेने टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू निर्माण केल्या असून शहराच्या हद्दीत असणारे लहान-मोठे डीवाईडर चौक येथे फुलझाडांचे फळझाडांचे वृक्षारोपण करत अनोखे इंदापूर निर्माण केले आहे. त्यामुळेस्वच्छ सर्वेक्षण 2020 याकरता भरीव कामगिरी करून शहराच्या नावलौकिकात भर पाडण्यासाठी नगर परिषदेच्या प्रशासनासह सर्व नगरसेवकांनी मेहनत घेण्याचे धोरण राबवलेले आहे. होय आमच्या शहरात सार्वजनिक स्वच्छतेचे सर्वेक्षण होते असे फलक झळकवत स्वच्छतेच्या बाबतीत “हम भी किसीसे कम नही” म्हणत जोरदार वेगवान स्वच्छता सुरु केली आहे.