मुंबई – गानसम्राज्ञी ‘लता मंगेशकर’ यांचा आज 90 वा वाढदिवस आहे. आतापर्यंत 25 हजारांहून अधिक गाणी गायलेल्या लतादीदी यांचा आज स्वतंत्र असा मोठा चाहतावर्ग आहे. या पार्श्वभूमीवर बॉलिवूडपासून राजकारण्यांपर्यंत सर्वांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष ‘राज ठाकरे’ यांनी देखील आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दीदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “आई, मुलगी, प्रेयसी, बहीण, मैत्रीण,पत्नी ह्या सर्व नात्यांना पडद्यावर ज्या एका अद्भुत आवाजाने गेली 77 वर्ष घट्ट बांधून ठेवलं त्या लतादीदींचा आज वाढदिवस…. दीदी, तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा”. असं राज यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटल आहे.
आई, मुलगी, प्रेयसी, बहीण, मैत्रीण,पत्नी ह्या सर्व नात्यांना पडद्यावर ज्या एका अद्भुत आवाजाने गेली ७७ वर्ष घट्ट बांधून ठेवलं त्या लतादीदींचा आज वाढदिवस…. दीदी, तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.@mangeshkarlata #LataMangeshkar pic.twitter.com/55ePXn93Kw
— Raj Thackeray (@RajThackeray) September 28, 2019