IND-W vs AUS-W One-Off Test in Mumbai – हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारताच्या महिला संघाची आजपासून येथे बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी कसोटी (December 21 to December 24) सुरु होत आहे.
गेल्या ४६ वर्षांच्या कालावधीत या दोन संघात झालेल्या १० कसोटीत आजवर भारतीय संघाने एकदाही विजय मिळवलेला नाही. मात्र, यंदा बलाढ्य इंग्लंडला कसोटीत पराभूत केल्यानंतर भारताच्या महिला संघाचा आत्मविश्वास उंचावला असून यावेळी ऑस्ट्रेलियालाही चकित करण्याची भारतीय महिला संघाला संधी आहे.
Smiles 🔛
`
Preps in full swing! 👍#TeamIndia gears up for the #INDvAUS Test in Mumbai 👏 👏 pic.twitter.com/RHXMPfokFD— BCCI Women (@BCCIWomen) December 20, 2023
भारताच्या महिला संघाने इंग्लंडचा ३४७ धावांनी पराभव केल्यामुळे घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियालाही आश्चर्याचा धक्का देण्याची क्षमता निश्चितच आहे. भारताची प्रमुख मदार फिरकी गोलंदाजीवर राहणार आहे. सैका इशाक व दीप्ती शर्मा यांनी इंग्लंडच्या फलंदाजांवर वर्चस्व राखले होते. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धही अशीच कामगिरी केली तर भारताला हा सामनाही जिंकत इतिहास रचण्याची नामी संधी आहे.
कर्णधार हरमनसह यस्तिका भाटीया, शफाली वर्मा व जेमिमा रॉड्रीक्स यांनी फलंदाजीत सातत्य राखले आहे. मात्र, स्टार फलंदाज स्मृती मानधनाकडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा आहे. मध्यमगती गोलंदाजीत रेणुकां सिंगनेही चमक दाखवली असून तीच्याकडून ऑस्ट्रेलियाविरुद्धही अशीच कामगिरी झाली तर भारताचा महिला संघ ऑस्ट्रेलियालाही धक्का देऊ शकतो.