Yashasvi Jaiswal broke Sachin Tendulkar’s historical record : भारतीय संघाचा 22 वर्षांचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल आपल्या छोट्या कारकिर्दीत मोठे विक्रम मोडून सतत चर्चेत आह. भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या मालिकेत त्याची बॅट चांगली कामगिरी करत आहे. यशस्वी जैस्वालने मालिकेतील शेवटच्या सामन्यातही एक मोठा विक्रम मोडला आहे. यावेळी त्याने खास यादीत क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे.
मोडला ‘सचिन तेंडुलकर’चा ऐतिहासिक विक्रम…
यशस्वी जैस्वाल टेस्ट फॉरमॅटमध्येही चाहत्यांना टी-20 क्रिकेटचा उत्साह देत आहे. इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेत त्याने आतापर्यंत 26 षटकार मारले आहेत. यासह तो कोणत्याही एका संघाविरुद्ध कसोटीत सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिन तेंडुलकरने आपल्या कसोटी कारकिर्दीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण 25 षटकार ठोकले होते. मात्र जैस्वालने सचिनचा हा विक्रम एकाच मालिकेत मोडला आहे.
कसोटीत एका संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार ठोकणारे भारतीय…
1. यशस्वी जैस्वाल विरुद्ध इंग्लंड (26 षटकार)
2. सचिन तेंडुलकर विरुद्ध ऑस्ट्रेलिया (25 षटकार)
3. रोहित शर्मा विरुद्ध दक्षिण आफ्रिका (22 षटकार)
4. कपिल देव विरुद्ध इंग्लंड (21 षटकार)
5. ऋषभ पंत विरुद्ध इंग्लंड (21 षटकार)
विराट कोहलीचा ‘हा’ विक्रम मोडला
यशस्वी जैस्वालने आपल्या कसोटी कारकिर्दीत सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत विराट कोहलीला मागे टाकले आहे. विराट कोहलीने आपल्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत 26 षटकार मारले आहेत. त्याचबरोबर यशस्वी जैस्वालने केवळ 9 कसोटी सामन्यांमध्ये 29 हून अधिक षटकार ठोकले आहेत.