आळंदी – तापकीरनगर, देहूफाटा, काळेवाडी, काळे कॅालनी, इंद्रायणीनगर परिसरातील नागरिकांच्या समस्यांबाबत दिघी पोलिस स्टेशनमध्ये मंगळवारी (दि. 19) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले यांनी केली. तसेच देहुफाटा परिसरात काॅलेज आहेत, काही वेळा चोरीच्या घटना घडतात त्यावर उपाययोजना करण्याचीही मागणी केली.
यावेळी दिघी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मच्छिंद्र पंडीत यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. महिला सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची गस्त वाढविणार असल्याचे सांगितले. तसेच परिसरात कोणतीही समस्या असल्यास तात्काळ पोलीस स्टेशन तसेच 112 नंबरवर काॅल करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी आळंदी नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले, माजी नगरसेवक दिनेश घुले, सुरेश तापकीर, मनसे शहराध्यक्ष अजय तापकीर, पंडीत तात्या तापकीर, अनिल तापकीर, विनोद कांबळे आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते. यावेळी बैठकीत येत्या 31 डिसेंबरच्या अनुषंगाने तसेच भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगानेही चर्चा करण्यात आली.