नवी दिल्ली – केंद्रीय पोलाद मंत्रालयाच्या अखत्यारीतील एनएमडीसी अर्थात राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाने विकासाचा चढता कल सातत्याने कायम राखत 2021 सालच्या डिसेंबर महिन्यात 3.95 दशलक्ष टन लोह खनिजाचे उत्पादन केले आणि 3.40 दशलक्ष टन लोह खनिजाची विक्री केली आहे.
भारतातील या सर्वात मोठ्या लोह खनिज उत्पादक कंपनीने गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील लोह खनिज उत्पादनात किरकोळ वाढ नोंदविली आहे आणि कंपनीने स्थापन झाल्यापासूनच्या प्रत्येक डिसेंबर महिन्यात नोंदविलेल्या कामगिरीमध्ये डिसेंबर 2021 मध्ये सर्वोत्तम कामगिरी नोंदविली आहे.
आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या 9 महिन्यांमध्ये लोह खनिजाचे एकंदर उत्पादन 28.32 दशलक्ष टन आणि विक्री 28.36 दशलक्ष टन झाल्यामुळे, एनएमडीसीने 9 महिन्यांतील एकंदर सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली आहे. एनएमडीसीने गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत या वर्षी उत्पादनात 30% आणि विक्रीमध्ये 27% ची वाढ नोंदविली आहे.