मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर काही दिवसांपूर्वी पोलिस निरीक्षक भिमराव घाडगे यांनी गंभीर आरोप केले होते. यामुळे काल अकोल्यामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून परमबीर यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे.
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस निरीक्षक भिमराव घाडगे यांनी परमबीर सिंग यांच्या विरोधात तक्रारीमध्ये अंडरवर्ल्ड सोबत संबंध असल्याचे आरोप केले होते. त्या तक्रारीच्या विरुध्द अकोला येथील कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये परमबीर यांच्या विरोधात तब्बल २७ विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात परमबीर सिंग यांना कधीही अटक होवू शकते.
दरम्यान, परमबीर सिंग यांनी भिमराव घाडगे यांना एका खोट्या चकमक प्रकरणी अडकविले होते. घाडगे हे आपले ऐकत नसल्याने परमबीर सिंग यांनी त्यांच्या विरुध्द कट रचला होता. एका खोट्या चकमकीच्या गुन्ह्यात त्यांना अडकविले होते. नंतर या प्रकरणाचा तपास झाला आणि त्या गुन्ह्यातून न्यायालयाने भिमराव घाडगे यांना निर्दोष सोडले होते.