चेन्नई – तमिळ चित्रपटसृष्टीशी संबंधित व्यक्तींच्या 40 पेक्षा जास्त ठिकाणांवर आज आयकर विभागाने छापे टाकले. काही निर्मात्यांनी आणि वितरकांनी करचोरी केली असल्याच्या संशयावरून हे छापे घालण्यात आले.
कलईपुली थानू, एस. आर. प्रभु, अंबु चेझिया आणि ज्ञानवेल राजा यांच्यासह एकूण 10 निर्मात्यांच्या ठिकाणांवर छापे घालण्यात आले. सकाळी सहा वाजता छापे घातल्यानंतर सुरू झालेली कारवाई रात्री उशीरापर्यंत चालू होती. यापूर्वी 27 जूलै रोजी तमिळनाडूतील रिअल इस्टेट कंपन्यांवर छापे घालण्यात आले होते व 150 कोटी रूपये जप्त केल्याचा दावा केला गेला होता.